पाकिस्तानी सीमा आणि नोएडात राहणारा सचिन यांची प्रेमकहाणीची (Love Story) चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. भारतासह पाकिस्तानातही सीमा हैदर ही चर्चेत (Love Story) आली आहे. पबजी खेळत असताना सीमा आणि सचिन यांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सचिनसोबत लग्न करण्यासाठी ती पाकिस्तान सोडून थेट भारतात आली. तिचं भारतात येणं कायदेशीर की बेकायदेशीर ? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. नेमक हे प्रकरण काय आहे? चला पाहूयात…
सीमा हैदर ही पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जैसमाबाद येथील रहिवासी आहे. कागदपत्रांनुसार तिचा विवाह गुलाम रझा नावाच्या व्यक्तीशी 2014 मध्ये झाला होता. त्यांना चार मुलेही आहेत. 2019 मध्ये गुलाम रझा कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला आणि तेथून सीमाला पैसे पाठवत असे. सीमाच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर तो कधीच परत आला नाही. दरम्यान, 2022 मध्ये सीमानं PUBG गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडाच्या जेवर येथील रहिवासी असलेल्या सचिनशी मैत्री केली. दोघेही प्रेमात पडले आणि या वर्षी मार्चमध्ये दोघांनी नेपाळमध्ये लग्न केले. यानंतर दोघेही मायदेशी परतले होते.
सीमा 12 मे रोजी नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आणि सचिनच्या घरी पोहोचली. भारतात उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये दीड महिना राहिली. त्यानंतर एक पाकिस्तानी महिला तिच्या मुलांसह बेकायदेशीरपणे राहत असल्याचं पोलिसांना कळालं. याची कुणकुण लागताच सचिन आणि सीमा मुलांना घेऊन पळून जाण्याच्या बेतात होते. पण 4 जुलै रोजी त्यांना हरियाणाच्या वल्लभगड येथे पकडण्यता आलं. दोघांनाही अटक करून लुक्सर तुरुंगात ठेवण्यात आलं. मात्र, 7 जुलै रोजी जेवर येथील एका न्यायालयाने या दोघांनाही जामीन दिला. जोपर्यंत कोर्टात प्रकरण सुरू आहे, तोपर्यंत सीमा सचिनसोबतच राहील. ती घर बदलणार नाही, असा आदेश कोर्टाने दिला.
आपल्या नवऱ्याला सोडून पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर हीने आता भारतातच आपले प्राण जावे असे म्हटले आहे. आपले नाव तिने बदलून ठाकूर असे केले आहे. तसेच आपला आणि मुलांचा धर्मही तिने बदलून त्यांना हिंदू केले आहे. पब्जी गेममुळे आपले सचिनशी सुत जुळले आहे. आता आपल्या पुन्हा पाकिस्तानात जायचे नाही. मला आणि माझ्या मुलांना पाकिस्तानात पाठवू नका अशी विनंती तिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे.