HEALTH WEALTH : ऍसिडिटी हा अगदी शंभरातून पंच्याण्णव जणांना होणारा त्रास आहे . म्हणायचा अर्थ एवढाच की हा अगदी सर्वसामान्य पणे अनेकांना उद्भवणारा त्रास… मात्र प्रत्येकाला वेगवेगळे परिणाम दाखवतो . अनेकांना डोकेदुखी ,मळमळ ,उलटी ,पोटदुखी, जुलाब अशा अनेक त्रासांना सामोर जाव लागत . मग अशावेळी सामान्यतः आपण घरगुती उपाय करत असतो . यात इनो ,सोडा ,लिंबू पाणी अशा उपायांचा आपण अवलंब करतो . तर आज तुम्हाला काही अशी पथ्य सांगणार आहे जी तुम्हाला त्रासदायक देखील होणार नाहीत आणि तुमचा सातत्याने होणाऱ्या ऍसिडिटीचा त्रास देखील कमी करण्यास मदत करेल.
1. जेवणाच्या वेळा पाळा अर्थात सकाळी 10 वाजण्याच्या आत तुमचा भरपेट नाष्टा खूप महत्त्वाचा आहे . जर तुम्ही या वेळेमध्ये भरपेट जेवणच केले तर आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
2. दुपारचे जेवण हे 2 वाजेपर्यंत अवश्य करा . सकाळी जर भरपेट नाश्ता केला असेल तर दुपारचे जेवण पोटाला आधार मिळेल एवढेच करा.
3. सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे रात्रीचे जेवण किती आणि केव्हा करावे . जर रात्रीचे जेवण हे 8 वाजण्यापर्यंतच करावे . जेणेकरून शरीराच्या पचनक्रियेनुसार योग्य वेळेमध्ये शारीरिक पचनक्रिया पूर्ण होईल.
4. कोणत्याही परिस्थितीत रात्री 11 नंतर कोणताही पदार्थाचे सेवन करू नका . जर तुम्हाला अति ऍसिडिटीचा त्रास असेल तर हेच सर्वात महत्त्वाचे पथ्य आहे , की रात्री 11 नंतर कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नका.
5. तुर डाळ, मेथी , टोमॅटो असे काही पदार्थ आहेत जे पित्तकारक आहेत . जमेल तितके या पदार्थांना टाळा.
6. फळ कोणतेही असो ते सकाळच्या वेळेतच खावे, सकाळच्या नाष्ट्यामध्ये हलका आहार घेतल्यानंतर एखादे फळ खावे . उपाशी पोटी कोणतेही फळ खाऊ नये .
7. तहान लागली नसेल तरी ठराविक वेळेचा अलार्म लावून ग्लासभर तरी खुर्चीत बसून किंवा खाली बसून शांतपणे पाणी प्यावे. शरीराला आवश्यक पाणी मिळाल्याने ऍसिडिटीचा त्रास बराच कमी होतो.
8. उपवास करणे : आजकाल उपवास याचा अर्थ उपवासाचे भरपेट पदार्थ खाणे असा होतो . पण हा उपवास वेगळा आहे . तुम्हाला नक्की किती ऍसिडिटीचा त्रास आहे यावर तुम्ही हा उपवास ठरू शकता . आठवड्यातून एक वेळा , पंधरा दिवसातून एक वेळा , किंवा महिन्यातून एक वेळा… तो एक दिवस असा पाळा ज्या आदल्या दिवशी 8 पूर्वी घेतलेल्या जेवणानंतर पोटामध्ये कोणताही अन्नपदार्थ जाऊ देऊ नका . गरज पडेल तेव्हा पाणी पीत राहणे आणि ग्लासभर एक वेळा ताक पिणे . असा उपाय करून पहा ,अवश्य फरक जाणवेल . वैद्यकीय सल्ला घ्यावा.
9. रोज दहा मिनिटे तरी व्यायाम करा . यामध्ये कमीत कमी पाच सूर्यनमस्कार अवश्य करा . व्यायामाने पचन क्रिया सुरळीत राहते
10. चहा जमेल तेवढा कमी करा
आजच्या या लेखामध्ये इथेच थांबूयात . उद्याच्या लेखांमध्ये पाहूयात की सकाळच्या भरपेट नाश्त्यामध्ये किंवा भरपेट जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत . लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा.