Breaking News

CompetitiveExam: स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला अन् नशीब पालटलं; आता महिन्याला कमवतो तब्बल इतके हजार रुपये

568 0

छत्रपती संभाजीनगर: अनेक तरुणांचं प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न असतं या स्वप्नांचा पाठलाग करत अनेक तरुण दिवस-रात्र अभ्यास करतात. प्रचंड मेहनतीतून काही तरुणांचं हे स्वप्न साकार होतं तर अनेकांच्या पदरी निराशा येते. 

निराशा आल्यानंतर अनेक तरुण आत्महत्या सारखं टोकाचा पाऊल देखील उचलताना पाहायला मिळतात मात्र छत्रपती संभाजी नगर मधील एका तरुणांनं स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय सोडून दिला आणि त्याचं नशीबच पालटलं.

ही गोष्ट आहे छत्रपती संभाजी नगरमधील मनोहर सूर्यवंशी यांची. मनोहर सूर्यवंशी हे मूळचे परभणी जिल्ह्यातील त्यांचे आई-वडील शेती करतात घराची परिस्थिती अतिशय नाजूक घरातील परिस्थिती सुधारावी यासाठी मनोहर सूर्यवंशी यांनी स्पर्धा परीक्षा देत प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलं त्यासाठी ते आपल्या भावासह छत्रपती संभाजी नगर शहरात आले. तीन ते चार वर्ष त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. मात्र सातत्यपूर्ण कष्ट करूनही स्पर्धा परीक्षेत यश येत नव्हतं स्पर्धा परीक्षेच्या जागा निघत नव्हत्या अशा वेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय सोडून दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मनोहर सूर्यवंशी यांनी चहाचं दुकान सुरू केलं. मनोहर यांचं हे दुकान आज व्यवस्थित रित्या सुरू असून यातून ते दरमहा 60 ते 70 हजार रुपये कमवत आहेत

Share This News
error: Content is protected !!