नागपूर: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत
18 तारखेपासून सलग महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात मॅरेथॉन बैठका सुरू असून या बैठकीत महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होऊन पितृपक्षानंतर जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशातच आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना त्यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या एका युवा नेत्यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतातील सर्वात शिक्षित व्यक्ती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचा मुलगा आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस याज्ज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार काटोल मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असून यावर्षी काटोल विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच सुटेल असं याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना म्हटलं आहे.
त्यामुळे काटोल विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे