#HAIR CARE : केस कोरडे झाले आहेत ? घरच्या घरी करा ‘स्पा’, मिळतील चमत्कारिक फायदे

684 0

#HAIR CARE : केसांची चांगली वाढ होणे आणि ते दाट दिसणे यासाठी महिला नेहमी प्रयत्न करत असतात. पण केस लहान असो किंवा मोठे ते मऊ आणि चमकदार दिसावेत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मग अशावेळी सलोनमध्ये जाऊन महागडे स्पा देखील तुम्ही केले असतील. पण तुम्ही घरच्या घरी देखील अगदी सोप्या पद्धतीने केसांना चांगले पोषण देऊन स्पा करू शकता. आठवड्यातून अगदी दोन वेळा जरी हा स्पा केला तरी तुम्हाला विश्वास बसणार नाही. चमक केसांमध्ये येईल आणि तितकाच मऊपणा देखील केसांमध्ये वाढीस लागेल.

यासाठी एका बाऊलमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे तुमच्या केसांच्या उंचीनुसार एलोवेरा जेल यामध्ये एक विटामिन इ ची कॅप्सूल , एक मोठा चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा खोबऱ्याचे तेल घालून हे सर्व मिश्रण तोपर्यंत हलवून घ्या जोपर्यंत या सर्व पदार्थांचे टेक्सचर हे पांढऱ्या रंगाचे घट्टसर दिसत नाही.

आता आंघोळीपूर्वी एक तास हा पॅक तुमच्या केसांना लावायचा आहे. मुळांना न लावता काही अंतरापासून केसांना हा पॅक लावून तासभर ठेवा आणि त्यानंतर एका तासाने कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. माईल्ड शाम्पूने केस धुतल्यानंतर कंडिशनिंग करायला विसरू नका. ही प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा केल्यास तुम्हाला चमत्कारिक फायदे दिसून येतील.

Share This News
error: Content is protected !!