HEALTH WEALTH : हिवाळ्यात करू नका ‘या’ चुका; अन्यथा, त्वचेवर होईल वाईट परिणाम

275 0

हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, शरीराला खाज येणे, चेहरा काळवंडणे अशा समस्या हमखास जाणवतात. ऋतुमानानुसार त्यात पुन्हा फरक पडतो. परंतु तुमच्या रोजच्या जीवनचक्रमध्ये तुम्ही करत असलेल्या काही चुका टाळल्याने तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही हे नक्की यासाठी फॉलो करा फक्त या टिप्स…

See the source image

१. आंघोळ करत असताना अतिकडक पाण्याचा वापर करू नका. थंडीच्या दिवसात ग्लिसरीन सोप वापरणे टाळावे. साबण वापरण्याऐवजी डाळीचे पीठ हळद आणि दुधाची साय एकत्र करून लावल्यास उत्तम, यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही आणि मलाईमुळे मॉइश्चराईज देखील होईल.

२. डोक्याची त्वचा कोरडी पडल्याने मोठ्या प्रमाणावर केस गळती होत असते. त्यामुळे कोमट तेलाने आठवड्यातून किमान दोन वेळा तरी मसाज करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचे अति कडक गरम पाण्याने डोकं धुणे लगेच थांबवा.

३. आंघोळ झाल्यानंतर हात आणि पायाच्या त्वचेला चांगल्या क्वालिटीचे बॉडी लोशन लावायला विसरू नका. यामुळे त्वचा काळी पडणे आणि त्वचा कोरडी पडण्यापासून संरक्षण होईल त्यामुळे खाज देखील येणार नाही.

४. हिवाळ्यामध्ये सनस्क्रीन लावायला विसरू नका… हो बऱ्याच जणींना हिवाळ्यात सनस्क्रीमची आवश्यकता नाही, असा खूप मोठा गैरसमज असतो. ऋतू कोणताही असू द्या सनस्क्रीन अवश्य वापरा.

५. ओठावर दिवसा कोणतेही जेल लावू नका. रात्री झोपताना ओठांवर दुधाची साय किंवा चांगल्या प्रतीचे क्रीम लावून कमीत कमी एक मिनिट गोलाकार मसाज करा.

६. भरपूर पाणी प्या.

Share This News
error: Content is protected !!