काही दिवसांत आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन (Ganesh Chaturthi 2023) होणार आहे. लाडक्या बाप्पाने सर्व बाप्पामय होणार आहे. मुंबईचा लाडका आणि भक्तांना पावणारा लालबागचा राजाचे प्रथम दर्शन आज घडणार आहे. लालबागचा राजाचं प्रथम दर्शन (प्रिंट आणि डिजिटल माध्यमांसाठी) शुक्रवार आज 15 सप्टेंबर 2023 संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे. तुमच्या लाडक्या बाप्पाचं देखरुप पाहण्यासाठी थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पाहता येणार आहे.
लालबागचा राजाची मनोरंजक कहाणी
तुमचा आमचा लाडका लालबागचा राजाची कहाणी अतिशय रंजक आहे. यंदा बाप्पाचे 90 वर्ष असून या मंडळाची स्थापना अनेक वर्षांपूर्वी म्हणजे 1934 मध्ये मुंबईतील प्रसिद्ध असं लालबाग बाजारपेठेत झाली. काही मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येतं या मंडळाची स्थापना केली. या बाप्पाला गेल्या 90 वर्षांपासून कांबळी ज्युनियर कुटुंब बनवतात. आज आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून लालबागच्या राजाचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. काळानुसार लालबागच्या राजाच्या मूर्तीमध्ये कशाप्रकारे बदल झाला हे आपण यामध्ये पाहू शकता…
पहा व्हिडिओ 👇👇👇
View this post on Instagram
लालबागचा राजा हा फक्त मुंबईचा नाही तर अख्खा देशाचा आहे. या राजाचा दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून भक्त येतात. राजकारणी असो किंवा सेलिब्रिटी राजाचा चरणी दरवर्षी नतमस्तक होताना दिसतात.लालबागचा राजा हा मूळ नवसाने स्थापन करण्यात आला. कोळी आणि इतर व्यापारी बंधूनी नवस केला आणि हा राजा लालबागच्या मार्केटमध्ये आला. 90 वर्षांपासून तो दरवर्षी येतो आणि कोळी बांधवांना इथे अतिशय मान आहे.
तुमच्या लाडक्या बाप्पाचं देखरुप पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा