आज श्रावणमासाचा पहिला सोमवार … श्रावणी सोमवार आणि या दिवशी करण्यात येणारे व्रत हे अत्यंत फलदायी असते . शिवपार्वतीची आज होणारी पूजा म्हणजे आयुष्यातील सर्व संकटांमधून मुक्ती मिळवण्याचा मार्ग…
मान्यतेनुसार चंद्र देवाने याच दिवशी महादेवाची पूजा करून मुक्ती मिळवली . म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे . देशभरामध्ये आज शिवभक्त मनोभावे पूजा-अर्चा ,व्रत-वैकल्य करत आहेत . पुण्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध अशा ओंकारेश्वर मंदिरामध्ये देखील भाविकांनी तुडुंब गर्दी केली आहे . श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट…