Education Of Ambedkar:आंबेडकरांनी दारावर पदव्यांच्या पाट्या लावल्या असत्या तर दार कुठंय शोधावं लागलं असतं!

4633 0

आयुष्यात एखाद-दुसरी पदवी काय मिळवली तर तुम्ही-आम्ही आपल्या घराच्या दारावर त्या पदवीची भली-मोठी पाटी लावून बघा बघा, मी किती शिकलोय, याचा आयुष्यभर टेंभा मिरवत असतो. पण, समजा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शैक्षणिक पदव्यांच्या पाट्या दारावर लावल्या असत्या तर त्यांच्या घराचं दार तरी दिसलं असतं का?

भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त विधान केलं आणि मग त्या वक्तव्याचा निषेध म्हणून देशभर निदर्शनं करण्यात आली. अमित शाह यांनी संसदेत ज्या महान व्यक्तिमत्त्वाविषयी अकलेचे तारे तोडले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात किती शिक्षण घेतलंय, किती पदव्या मिळवल्या यावर एकदा तरी नजर टाकायला हवी होती. असो, अर्ध्या हळकुंडानं पिवळे होणाऱ्यांना या शिक्षणाची ताकद काय समजणार म्हणा! अजिबात वेळ वाया न घालवता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती शिक्षण घेतलं होतं यावर आपण तरी नजर टाकू…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आणि पदव्या

प्राथमिक शिक्षण – प्रतापसिंह हायस्कूल, सातारा
माध्यमिक शिक्षण – एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई
BA – (अर्थशास्त्र व राज्यशास्त्र) – बॉम्बे युनिव्हर्सिटी
MA – कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क
PhD – कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क
MSc – लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
Bar-at -Law – ग्रेज इन्, लंडन
D.Sc – लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
L.L.D – कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क
D. Litt. – उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैदराबाद

भारत देशाचे कायदेमंत्री बनलेले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरलेले महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण 32 शैक्षणिक पदव्या मिळवल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्यांना 11 भाषा वाचता-बोलता आणि लिहिताही येत होत्या. एकूणच काय, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आणि त्यांनी मिळवलेल्या पदव्या पाहाता त्यांच्याविषयी वादग्रस्त बोलणं म्हणजे सूर्यप्रकाशात काजव्यांनी चमचमण्यासारखं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं हे विपुल ज्ञान पाहाता मला तर इतकंच म्हणावंसं वाटतं… कुठं पौर्णिमेचा चंद्र आणि कुठं चतकोर चंद्रकोर!

Share This News
error: Content is protected !!