Sanjay Raut

SANJAY RAUT: मुंबई महानगरपालिका कळीचा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार ? संजय राऊत यांचं सूचक विधान

691 0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यातच लागणार आहेत. विधानसभेला झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलेल्या महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी सुरू केली आहे. तर या निवडणुकांमध्ये युती आणि आघाडीतील घटक पक्ष हे स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरच आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (upcoming elections in maharashtra) स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. कार्यकर्त्यांच्या इच्छेचा विचार करू, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay raut) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केलं.

संजय राऊत म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्ते नेहमीच आग्रही असतात. कारण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते. प्रत्येकाला आपआपल्या मतदारसंघातून लढण्याची इच्छा असते. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांकडून स्वबळासाठी आग्रह केला जातो. शिवसेनेची अनेक जागांवर ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेचा विचार केला जाऊ शकतो. मात्र महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्यावर आमचा भर असणार आहे.’

पुढे बोलताना संजय राऊत असंही म्हणाले की, ‘मुंबई महानगरपालिका हा आमच्यासाठी कळीचा मुद्दा आहे. मुंबईत मराठी माणसाला मारहाण होत असल्याची प्रकरण आपण पाहिली. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असणं गरजेचं आहे. त्यामुळेच मुंबईत स्वबळावर लढण्याचा विचार करू.’ संजय राऊत यांच्या या विधानानंतर आता ठाकरे गट मुंबईत स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या स्वबळावर लढण्याचा हा विचार केवळ मुंबई पुरताच मर्यादित आहे, असंही राऊत म्हणाले.

राऊत आज पुणे दौऱ्यावर

संजय राऊत आज पुणे, पिंपरी – चिंचवड दौऱ्यावर आहेत. ते महानगरपालिका निवडणुकांच्या विषयावर स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठका आणि चर्चा करणार आहेत. या चर्चांमधून स्वबळावर लढायचं की नाही ? महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्यास कोणत्या जागांवरती निवडणुका लढवायच्या, याचा आढावा घेतला जाणार आहे.

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Nirupam : काँग्रेसचा हात सोडत संजय निरुपम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Share This News
error: Content is protected !!