काहीतरी चटपटीत हवंय आणि झटपटही…? घरच्या घरी असा ‘मसाला पापड’ ट्राय करा

342 0

घरी आपण बरेचसे पदार्थ बनवतो. पण रोजच्या जेवणामध्ये असं चटपटीत तरी काय बनवणार ? नक्कीच जेवण बनवणाऱ्याला देखील हा प्रश्न रोज पडत असणार… पण एक पर्याय आहे. तो म्हणजे मसाला पापड. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण याच मसाला पापडने बऱ्याच वेळा जेवणाची सुरुवात करतो. मग त्यासाठी काय लागतंय …,असा मसाला पापड घरी ट्राय करून तर पहा !

उडदाचा पापड भाजून घ्यायचा आहे. तर मग भाजताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. पापड थेट गॅस मोठा करून भाजण्यापेक्षा गॅसवर तवा ठेवा आणि ज्या पद्धतीने आपण पोळी भाजतो तसाच या पापडाला देखील भाजून काढा. त्यामुळे होईल एवढेच की तो हॉटेल सारखा सरळ भाजला जाईल. घरामध्ये पापड भाजताना आपण थेट गॅसवर भासतो त्यामुळे तो वाकडातिकडा भाजला जात असतो.

आता या मस्त पापडावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि थोडेसे लिंबू पिळा आणि हे सर्व जिन्नस पापडावर भुरभुरून टाका. आवडत असेल तर बारीक शेव देखील घालू शकता. रोजच्या जेवणामध्ये काहीतरी चटपटीत पदार्थ तयार आहे.

Share This News
error: Content is protected !!