BEAUTY TIPS : हिवाळ्यात केस गळतीने वैतागले आहात ? बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा ‘हे’ घरगुती उपाय लवकर परिणाम मिळवून देतील

586 0

हिवाळ्यामध्ये होणारी केस गळती ही खरंतर सामान्य आहे. केसात कोंडा होणे, केस कोरडे होणे अशा समस्या हिवाळ्यात अवश्य जाणवतात. पण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या केस गळतीने तुम्ही वैतागले असाल तर हे काही खास घरगुती उपाय अवश्य करून पहा. बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्स पेक्षा हे उपाय चांगला आणि लवकर परिणाम मिळवून देतील हे नक्की.

See the source imageकढीपत्ता :
रात्री खोबऱ्याच्या तेलामध्ये किंवा तुम्ही जे तेल वापरत असाल त्या तेलामध्ये मूठभर कढीपत्ता टाकून तेल गरम करून घ्या. हे तेल कोमट झाल्यानंतर केसाच्या मुळाशी गोलाकार हळुवार मसाज करा. रात्रभर हे तेल असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे केस गळती थांबते. त्यासह पांढऱ्या केसांच्या समस्येवर देखील आराम मिळेल.

See the source image

मेथी :
मेथीचे दाणे मूठभर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ते बारीक करून त्याची पेस्ट केसांना लावा. अंदाजे अर्धा तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या . यामुळे केस मजबूत होतील.

ग्रीन टी :
ग्रीन टीने केस आठवड्यातून तीन वेळा तरी धुवून पहा, यामुळे तात्काळ केस गळती हळूहळू कमी होईल.

See the source image

Share This News
error: Content is protected !!