Aditya L1

Aditya L-1: ‘आदित्य एल – 1’ चे स्वातंत्र्यदिनापूर्वी उड्डाण होण्याची शक्यता; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये ?

645 0

तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम ‘आदित्य एल – 1’ (Aditya L-1) प्रत्यक्षात येत असून येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी तिचं उड्डाण होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी आवश्यक उपकरण आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राने विकसित केलं आहे. जानेवारी 2008 मध्ये संकल्पनेच्या स्वरूपात अस्तित्त्वात आलेल्या आदित्य एल – 1 (Aditya L-1) मोहिमेला 2016 – 17 मध्ये बजेट (Budget) प्राप्त झालं होतं.

चांद्रयान-3 तयारी झाली ! काय आहेत वैशिष्ट्ये?

मोहिमेसाठी आवश्यक सर्व सातही उपकरणं आता सज्ज झाले असून सर्वांनाच आता इस्त्रोच्या उड्डाणाची प्रतीक्षा आहे. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘लॅग्रांजीयन पॉइंट’ पर्यंत पोचण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, अन्यथा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची वाट पहावी लागणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास सौर मोहिमा यशस्वी करणाऱ्या अमेरिका आणि युरोपिय युनियनच्या पंक्तीत भारताला स्थान मिळेल.

आयएमडीने राज्यातील मान्सूनबाबत दिले ‘हे’ महत्वाचे अपडेट

आदित्य एल 1 या मोहिमेची काय आहेत वैशिष्ट्ये ?
1) आदित्य एल-1 (Aditya L-1) ही सौर अभ्यासासाठी इस्रोची (ISRO) पहिली अंतराळ वेधशाळा आहे. जी पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या पहिल्या लॅग्रेंज पॉइंटभोवती सूर्याला प्रदक्षिणा घालणार आहे.

2) ‘आदित्य’ मध्ये 400 किलोग्रमचा उपग्रह आणि सात उपकरणे पाठविण्यात येणार.

3) सूर्यावरील घडणाऱ्या विविध घटनांचा पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये अभ्यास करण्यासाठी, तसेच सौर वादळांच्या सूचनेसाठी सात वेगवेगळ्या पेलोड्सना आदित्य एल-1 मध्ये आहे.

4) यामध्ये हार्ड एक्स-रे ते इन्फ्रारेड पर्यंत सौर किरणोत्सर्गाचे अखंड मापन केले जाईल.

5) तसेच एल-1 (Aditya L-1) बिंदूंवरील सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रासह सौर वाऱ्यातील कणांचे निरीक्षणही घेता येईल.

यामुळे भारताची सौर मोहीम स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी यशस्वीरित्या उड्डाण करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ही मोहीम यशस्वी झाली तर अमेरिका आणि युरोपीय युनियनच्या पंक्तीत भारताला मान मिळेल.

Share This News
error: Content is protected !!