Aandolan

पुण्यातील संचेती रुग्णालयाजवळील उड्डाणपुलावर चढून तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन

652 0

पुणे : पुण्यातील संचेती रुग्णालयाजवळील (Sancheti Hospital) उड्डाणपुलावर चढून एका तरुणानं शोले स्टाईल जीवघेणं आंदोलन सुरु केलं आहे. त्याने हे आंदोलन करत जुन्नरच्या तहसीलदारांवर कारवाईची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे संचेती चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्या ठिकाणी नेमके काय चालले हे पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

काय आहे नेमके प्रकरण?
संबंधित तरुण संचेती चौकातील उड्डाणपुलाच्या खांबावर चढून आंदोलन करत आहे. तसेच इतक्या उंचावरून उडी मारण्याची धमकीसुद्धा त्याने दिली आहे. या तरुणाच्या हातामध्ये एक फ्लेक्स असून त्यावर जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करण्यात यावी, असा मजकूर लिहिला आहे. या प्रकारामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्या तरुणाच्या बचावासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या तरुणाचे नाव महेंद्र संपत डावखर (Mahendra Sampat Davkhar) असे आहे. या तरुणाने जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करण्यात यावी ही मागणी लावून धरली आहे.

Share This News
error: Content is protected !!