Pune Crime News :ATM मधून पैसे काढताय?अशी चूक करू नका…!

243 0

पुणे : ऑनलाइन फ्रॉडच्या घटना सातत्याने वाढत आहेत.पोलीस प्रशासनाच्या मार्फत सामान्य जनतेने ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना काळजी घेण्याचे नेहमीच आवाहन केले जाते.एटीएम मधून पैसे काढताना देखील सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.
एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बाहाण्याने एका अज्ञात आरोपीने महिलेच्या अकाउंट मधून 20,000 रुपये लंपास केले आहेत. याप्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार,फिर्यादी महिला या एटीएम मध्ये कॅश काढण्यासाठी गेल्या असता,त्यांना काही अडचणी आल्या, म्हणून अज्ञात इसमाने त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. आरोपीने या महिलेची नजर चुकवून एटीएमचे पिन पाहून घेतले. आणि त्यानंतर हात चालाकिने दुसरेच एटीएम महिलेला दिले.
त्यानंतर या महिलेच्या अकाउंट वरून वीस हजार रुपये काढून या आरोपीने आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी एका 36 वर्षीय महिलेने बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली असून याप्रकरणी बंड गार्डन पोलीस पथक अधिक तपास करत आहे.

Share This News
error: Content is protected !!