“सांगा आयुक्त साहेब…! या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आमचं स्थान काय आहे ?” हातगाडी ,फेरी ,पथारी ,स्टॉलधारक संघटना पुणे यांचा सवाल

300 0

पुणे : देश स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे.या स्वातंत्र्याच्या महोत्सवात पुणे शहरातील हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. हा देश हातगाडी ,फेरी, पथारी स्टॉलधारकांचा पण आहे.देशांत पथ विक्रेता अधिनियम २०१४ लागू करण्यात आला आहे.त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तो सन्मान मात्र पुणे महानगरपालिकेकडून राखलं जातं नाही.हे जाणीव ने वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे.मग ते भरमसाठ शुल्क आकारणी, भरमसाठ दंड वसूल, आणि याकरिता अनेक अटी आणि शर्ती लागू करण्यात आले आहे.फक्त आणि फक्त महसूल वसुली सुरू आहे.आणि याकरिता कोणता ना कोणता मार्ग आहे.

भरमसाठ शुल्क घेऊनही शहरातील हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.सुरक्षा नाही.कोणतीही योजना तयार केली नाही.धोरण नाही. भारत सरकारच्या पीएम स्वनिधी कर्ज योजनेतून कर्ज घेता येते नाही.तेथे अडथळे निर्माण करण्यात आले आहे.

या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आमचं स्थान काय आहे ? असा सवाल कार्यवाह जाणीव हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक संघटनेचे संजय शंके यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!