zahir

Loni Kalbhor News : आजी-आजोबांना भेटायला आलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

554 0

लोणी काळभोर : लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे राहत असलेल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रामदरा परिसरात रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान उघडकीस आली. झहीर समीर सय्यद (Zaheer Sameer Syed) (अंदाजे वय – 22 मु. पो. बारामती, फलटण नाका, नीलम पॅलेस) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
मृत झहीर सय्यदचे आजी आजोबा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती (Inamdar Vasti) या परिसरात वास्तव्याला आहेत. तर झहीर हा भारत फोर्स (Bharat Force) या नामांकित कंपनीत काम करत होता. घटनेच्या वेळी झहीर रामदरा परिसराकडे जाणाऱ्या मुळा मुठा कालव्यात आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली खरी पण त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या वरती येऊ शकला नाही. तो बराच वेळ वरती न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो कुठेच सापडला नाही.

यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झहीरचा मृतदेह लोणी काळभोर हद्दीत वाहताना आढळून आला. याची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने झहीरचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर पोलिसांनी या मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!