हनुमान चालीसा पठण व महाआरतीला अनुउपस्थित राहणार ? पाहा… काय म्हणाले वसंत मोरे

452 0

पुणे- गुढीपाडवा मेळावा व उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असून शनिवारी (दि.16 मार्च) राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यातील खालकर चौक येथील मारुती मंदिरात हनुमान चालीसा पठण व महाआरती होणार आहे.

या कार्यक्रमाला पुण्याचे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अनुपस्थित राहणार असल्याच्या चर्चा होत होत असतानाच वसंत मोरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

जर वसंत मोरे मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहतो, ठाण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहतो तर पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही का ? असा सवाल उपस्थित करत जिकडे साहेब असतील तिकडे मी असणारच अशी भूमिका वसंत मोरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून मांडली आहे.

वसंत मोरे नेमके काय म्हणाले, खालील लिंक क्लिक करा

https://www.facebook.com/watch/?v=1172876866798291&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

Share This News
error: Content is protected !!