VANRAJ ANDEKAR MURDER: वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी आणली परराज्यातून शस्त्रे; पोलीस तपासात धक्कादायक माहित

228 0

कुख्यात सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर पोलीस तपासात या प्रकरणात अनेक धक्कादायक पुढे येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांचे चिरंजीव वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील केएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वनराज आंदेकर यांच्या हत्येचा आरोप त्यांची बहीण संजीवनी जयंत कोमकर, मेहुणे जयंत लक्ष्मण कोमकर व गणेश लक्ष्मण कोमकर, प्रकाश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची मुदत संपल्याने त्यांना नुकतंच न्यायालयापुढे सादर करण्यात आलं होतं तर न्यायालयाने त्यांना 22 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी वनराज आंदेकराचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्र आणली होती, त्यापैकी चार पिस्तुल, दहा काडतूस आणि सहा दुचाकी व एक चार चाकी जप्त करण्यात आली. असल्याची माहिती त्यांनी न्यायालयापुढे सादर केली.

या प्रकरणाचे तपास अधिकारी यांनी वनराजचा खून करण्यासाठी परराज्यातून शस्त्रांची खरेदी झाल्याचं न्यायालयात सांगितलं. तर या प्रकरणी सरकारी वकील यांनी न्यायालयात माहिती देताना सांगितले, या प्रकरणाचे आरोपी हे मुख्य सूत्रधार असून संपत्ती आणि वर्चस्ववादातून त्यांनी अण्णा आरोपींच्या मदतीने पूर्वनियोजित कट असून निर्घुन पणे वनराज आंदेकर यांचा खून केला त्यासाठी त्यांना पैसे ,हत्यार वाहन पुरवठा अप्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आरोपींचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे या आरोपींना 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. यातून अजून कोणते महत्त्वाचे धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!