मुंबई: लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा तिकीट कापल्यानंतर आता भाजपाने पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून किरीट सोमय्या यांना पक्षात पुन्हा सक्रिय करत पक्षांतर्गत जबाबदारी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी किरीट सोमय्या हे भाजपाचे निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
किरीट सोमय्या 2014 ला भाजपा कडून मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते मात्र 2019 ला शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांचा तिकीट कापलं गेलं त्यांच्या ऐवजी मनोज कोटक यांना खासदार घ्यायची संधी मिळाली पुढे 2024 च्या निवडणुकीमध्ये ही किरीट सोमय्या यांचं तिकीट भाजपा कडून कापण्यात आलं याबरोबरच विद्यमान खासदार असणाऱ्या मनोज कोटक यांचंही तिकीट कापत मिहीर कोटेजा यांना भाजपाने उमेदवारी दिली होती.