आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा !

381 0

 

पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची
सजावट करण्यात आली.दरवर्षी या तीर्थस्थळी पाच ते सहा लाख भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेतात.याहीवर्षी कोरोना काळातील दोन वर्षानंतर भाविकांचा मेळा जमला आहे.पुण्यातील विठ्ठलवाडी याठिकाणचे विठ्ठल मंदिर हे प्राचीन पेशवेकालीन मंदिर आहे. मंदिराला प्रति पंढरपूर असे म्हणतात. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी चार ते पाच लाख नागरिक आषाढी एकादशी दर्शनासाठी येतात. या ठिकाणची यात्राही भरवली जाते. सिंहगड रोड परिसर व शहरातील आसपासच्या गावांतील अनेक नागरिक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात.भाविकांसाठी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच शांती निकेतन प्रतिष्ठानच्या वतीने तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन तैनात आहे.

Share This News
error: Content is protected !!