Pune University

University of Pune : पुणे विद्यापीठाकडून दिवाळीची सुट्टी जाहीर

610 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (University of Pune) दिवाळीनिमित्त शुक्रवारपासून (ता.10) ते शुक्रवारपर्यंत (ता. 17) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज बंद राहणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त सरकारी, निमसरकारी कार्यालयांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार शुक्रवारी धनत्रयोदशी निमित्त शासकीय सुट्टी, शनिवारी विद्यापीठात आयोजित जी-२० परिषदेच्या वेळेची पर्यायी सुट्टी, रविवारची नियमित सुट्टी, सोमवारी विद्यापीठात आयोजित जी-20 परिषदेच्या वेळेची पर्यायी सुट्टी, मंगळवारी बलिप्रतिपदेनिमित्त शासकीय सुट्टी, बुधवारी भाऊबीजेनिमित्त शासकीय सुट्टी, गुरुवारी विद्यापीठाच्या पदवीपद्रान सोहळ्याच्या वेळची पर्यायी सुट्टी, शुक्रवारी विद्यापीठाच्या अधिसभेच्या वेळेची पर्यायी सुट्टी असणार आहे. तसेच तिसरा शनिवार असल्यामुळे विद्यापीठाची नियमित सुट्टी आणि रविवारची सुट्टी मिळून कर्मचाऱ्यांना १० दिवस सुट्टी आहे. दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (ता.20) विद्यापीठातील कार्यालयांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.

Share This News
error: Content is protected !!