Pune Akashwani

पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरुच राहणार !

605 0

पुणे : पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री मा.श्री. अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.

खासदार मा.श्री. प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे. पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, या संदर्भात श्री. जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

श्री. जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा श्री. जावडेकर दिल्लीत गेल्यानंतर होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!