पुणे : पुण्यामध्ये 9 ऑगस्टला उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) जाहीर सभा होणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिरात ही जाहीर सभा पार पडणार आहे. युवक क्रांती दलाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे ही सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विद्या चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
