दिवंगत नेते हनुमंत साठे यांना पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने श्रद्धांजली सभेतून आदरांजली अर्पण

326 0

पुणे : आंबेडकरी चळवळीचे नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांचे निधन झाले. त्यानिमित्त पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने दिवंगत नेते हनुमंतराव साठे यांची शोकसभा शुक्रवार दि.23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वा. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह सातारा रोड, बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती .

सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारा कडून त्यांनी केलेल्या सामाजिक ,राजकीय योगदानाचे कौतुक केले .तसेच दलीत पँथर ,रिपब्लिकन पक्ष ,मातंग समाजाच्या विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्यांनी दलीत समाजाची मोठ्या प्रमाणात कार्य केले होते त्या आठवणी आणि त्यांचा कार्याचा सर्वच मान्यवरांनी गौरव केला .

या श्रद्धांजली सभेस माजी मंत्री रमेश बागवे ,आमदार सुनील कांबळे , झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, माजी सभागुह नेते सुभाष जगताप ,दलित महासंघाचे संस्थापक प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे, माजी आमदार राजीव आवळे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडी शहराध्यक्ष विजय डाकले ,रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण ,रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव परशुराम वाडेकर, रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक राहुल डंबाळे ,लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, मातंग आयोगाचे उपाध्यक्ष दिलीपराव आगळे, सोलापूर जिल्हा मातंग समाजाचे अध्यक्ष युवराज पवार, रवि पाटोळे, गोवर्धन खुडे यासह माजी खासदार, माजी मंत्री, पुणे शहरातील स, माजी आमदार, आंबेडकरी चळवळीतील संघटना प्रमुख, मातंग समाजातील संघटना प्रमुख पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक विविध समाजाचे प्रतिनिधी व सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी हनुमंत साठे यांचे स्मारक उभे राहिले पाहिजे असे बऱ्याच सामाजिक संघटनाच्या वतीने मागणी करण्यात आली .या कार्यक्रमास साठे यांचे कुटुंबीय मुलगा विरेन व पत्नी सत्यभामा व्यासपीठावर होते तर सर्व मान्यवर व्यासपीठ समोर बसेल होते .या सभेचे अध्यक्ष जेष्ठ आंबेडकरी चलवळीचे नेते अंकल सोनवणे होते.
शोकसभेचे सूत्रसंचालन अनिल हातागळे यांनी केले.

Share This News
error: Content is protected !!