पुण्यात तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

717 28

पुणे- आंतरराष्ट्रीय तृतीय पंथील ओळख दिनानिमित्ताने तृतीय पंथीयांसाठी २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ या कालावधीत ‘तृतीय पंथीय मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जगभरात ३१ मार्च हा दिवस तृतीय पंथी ओळख दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी करताना त्यांच्याकडील कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने  त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. १८ ते २१ वर्षाच्या तृतीय पंथी नागरिकांकडे वयाचा पुरावा नसल्यास त्यांना गुरू माँ ने दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून  ग्राह्य धरण्यात येईल.

२१ वर्षावरील तृतीय पंथी व्यक्तीने स्वत:चे वय सांगणारे दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अधिकाधिक तृतीय पंथी व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!