Pune News

Pune News : राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 35 जण जखमी

763 0

पुणे : पुण्याजवळीत (PuneNews) भोर येथे असलेलल्या राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. यामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. 30 ते 35 जणांना मधमाशांनी चावा घेतला. यापैकी तिन पर्यटक बेशुद्ध अवस्थेत होते. जखमींवर वेल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.

काय घडले नेमके?
आज रविवार सुट्टी असल्याने अनेक पर्यटक राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. यादरम्यान एका अति उत्साही पर्यटकांनी मारलेल्या सुगंधित परफ्युममुळे मधमाशांचे पोळ उठलं. अचानक मधमाशांच्या टोळक्याने हल्ला केल्याने पर्यटक गोंधळले. पर्यटकांची पळापळ झाली. किल्ल्यावरील इतर पर्यटकांनाही माशा चावल्या आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!