Dahi Handi Festival

Dahi Handi Festival : पुणे शहर व जिल्हा येथे साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत वाढवावी : आमदार सुनिल कांबळे

361 0

पुणे : पुणे शहर व जिल्हा येथे साजरा होणाऱ्या दहीहंडी (Dahi Handi Festival) या पारंपरिक उसत्वाची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब तसेचं राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना केली आहे.

Letter

पुणे शहर व जिल्ह्य दहीहंडी उत्सव (Dahi Handi Festival) समन्वय समितीचे समन्वयक अ‍ॅड. राहुल म्हस्के पाटील व जालिंदर बाप्पू शिंदे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलभाऊ कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. ते निवेदन स्वीकारत आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी त्वरित पत्राद्वारे मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. यावर लवकरात लवकर बैठक करून निर्णय घेऊ असे आश्वासन मा.मंत्री महोदयांनी दिले आहे. या प्रसंगी दिपक नागपुरे ही उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!