विजेचा शॉक लागून पुण्यात तिघांचा मृत्यू

509 0

पुणे: पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्यात विसर्ग करण्यात आला आहे. नदी पात्रात विसर्ग वाढल्यानं अंडा भुर्जी बनवणाऱ्या तीन जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाला आहे.  मध्यरात्रीत तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरात ही घटना घडली आहे.

झेड ब्रिज खालील अंडा भुर्जी स्टॉल येथे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने अंडा भुर्जी येथे काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले असता त्यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. डॉक्टरांनी पाच वाजताच्या दरम्यान मयत घोषित केले आहे.

अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25 रा. पुलाच्या वाडी डेक्कन)आकाश विनायक माने (वय वर्ष 21रा. पूलाची वाडी डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८) अशी शॉक लागून मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत.

Share This News
error: Content is protected !!