‘यावर्षीची MPSC परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाप्रमानेच व्हावी’ ; या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

369 0

पुणे : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम पुढील वर्षापासून लागू करून सध्याची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाप्रमानेच व्हावी. ह्या मागणीकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली .

अचानक लागू केलेल्या ह्या फतव्या मुळे अनेक विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. तसेच ह्या निर्णया विरोधात कोणत्याही विध्यार्थ्यांने आंदोलन करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. ही बाब लोकशाहीला काळिमा फासणारी व विध्यार्थ्यांचे मूलभूत अधिकार विरोधी आहे.आयोगाच्या व शासनाच्या ह्या दडपशाही विरोधात लालबहादूर शास्त्री रस्ता, नवीपेठ, येथे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतूत्वात आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रदीप देशमुख म्हणाले की , ” आयोगाचा नवीन अभ्यासक्रमाचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु विध्यार्थ्यांनाही नवीन अभासक्रमानुसार परीक्षेच्या तयारी करण्यासाठी वेळ देने ही गरजेचे आहे. सध्या होणाऱ्या परीक्षा ह्या आता असणाऱ्या अभ्यासक्रमानुसार व्हाव्यात .”

राज्यसरकारला स्थापन होऊन महीना होत आला तरी अद्यापही महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मंत्री मंडळ स्थापन करण्यासाठी वेळ लागत आहे तर विध्यार्थ्यांनाही नवीन अभ्यासक्रम प्रमाणे परीक्षा देण्यासाठी आयोगाने कालावधी देणे आवश्यक आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीला दिलेल्या संविधानात लोकशाही मार्गाने सरकाच्या अमान्य धोरणा विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. परंतु हे हिटलरवादी राज्यसरकार विध्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून रोखत आहे. हा लोकशाहीचा अपमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापी खपवून घेणार नाही.

विध्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच विध्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरून लढण्यासाठी तयार आहे. आणि विध्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत राहील. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी MPSC चा धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो,हौश मे आओ हौश में आओ राज्यसरकार हौश मे आओ ,ह्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

यावेळी प्रवक्ते प्रदीपदादा देशमुख ह्यांच्यासह रोहन पायगुडे, अजिंक्य पालकर, दीपक पोकळे, सागर काकडे, मदन कोठूळे, मच्छिंद्र उत्तेकर, मंगेश मोरे, राहुल तांबे,शंटीसिंग राजपाल, शशिकांत जगताप, देवा व्हाल्लेकर , निलेश वरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!