‘ही नव्या आयुष्याची सुरुवात’; फेसबुक लाईव्ह करत प्रशांत जगताप यांनी दिली आपल्या आजाराविषयी माहिती

1086 0

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पॅरॅलिसिसचा अटॅक येऊन गेल्याची माहिती स्वतः जगताप यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे दिली आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, माझ्या आजाराची माहिती कोणालाच कळाली नव्हती. मी अनेकांना भेटलो, पत्रकारांना भेटलो, कार्यकर्त्यांनाही भेटलो; पण त्यांनाही माझ्या चेहऱ्यात कोणताही बदल जाणवला नाही. मी जेव्हा माझा एक फोटो पाहिला, तेव्हा मला काहीतरी झालंय असं लक्षात आलं. म्हणून, मी डॉक्टरांना भेटायला गेलो असता, त्यांनी मला पॅरॅलिसिसचा झटका येऊन गेल्याचं सांगितलं.

जगताप यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला पॅरॅलिसिसचा झटका येऊन गेल्याची माहिती जगताप यांनी फेसबुकवर दिली आहे. ही नव्या आयुष्याची सुरुवात आहे, असंही त्यांनी यामध्ये म्हटलं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी परमेश्वराकडं प्रार्थना करत साहेबांना लवकर बरं करं, अशी प्रार्थना केली आहे.

प्रशांत जगताप यांचं फेसबुक लाईव्ह खालील लिंकवर 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=276621964666318&id=100050294837668&sfnsn=wiwspwa

Share This News
error: Content is protected !!