Pune Accident

Katraj-Kondhwa Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ‘त्या’ भीषण अपघाताचा व्हिडिओ आला समोर

1104 0

पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ (Katraj-Kondhwa Accident) आज विचित्र अपघात पाहायला मिळाला. या अपघातात (Katraj-Kondhwa Accident) एक जण ठार झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये शाळेच्या बसचा देखील समावेश आहे. या अपघातामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कात्रज कोंढवा खडी मशिन रोडवर सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, कशाप्रकारे अपघातग्रस्त ट्रकने बाकी वाहनांना धडक दिली. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या अपघाताची (Pune Accident) माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरचा (MH14 GD 6919) ब्रेक फेल झाल्याने त्याने बाकी वाहनांना धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण 8 वाहनांचे नुकसान झाले आहे.

या भीषण अपघातात (Katraj-Kondhwa Accident) प्रशांत कृष्णा चोरे (वय 43 वर्षे, रा धनकवडी, पुणे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पाच ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुणाला ॲम्बुलन्सने ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. इतर जखमी इसमाना जवळील भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!