Uma Shanti News

Pune News : अखेर ! ‘त्या’ प्रकरणी युक्रेनच्या गायिकेने मागितली माफी

300 0

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी युक्रेनची गायिका उमा शांतीने एका कार्यक्रमादरम्यान दोन्ही हातात तिरंगा घेऊन नृत्य केले आणि नंतर झेंडा प्रेक्षकांच्या दिशेने फेकला. तिच्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल अनेकांनी तिच्या या कृतीवर आक्षेप घेतला.

युक्रेनियन गायिका उमा शांतीचा तिरंग्याचा अपमान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वणव्यासारखा व्हायरल झाला होता. यानंतर मुंढवा पोलीस ठाण्यात शांती पीपल या बँडची प्रमुख गायिका उमा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी तिच्याबरोबर आणखी एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणी युक्रेनची गायिका उमा शांतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत भारतीय जनतेची माफी मागितली आहे.

Share This News
error: Content is protected !!