कंटेंट क्रियेटर महिलेला ओव्हरटेक करून मारहाण केलेला कारचालक पोलिसांच्या ताब्यात

274 0

पुण्यात खरंच महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे. तशीच एक गंभीर घटना काल पुण्यामध्ये घडली. पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवर जेरीलन डिसिल्वा नावाची महिला दोन लहान मुलांबरोबर वाहन चालवत जात होती. त्यावेळी तिच्या गाडीला ओव्हरटेक करून गाडी बाजूला घेऊन एका अज्ञात इसमाने तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ जेरीलनने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी देखील तात्काळ तक्रार दाखल करून आरोपीला 24 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

जेरीलन डिसिल्वा या डिजिटल कंटेंट क्रियेटर आहेत. सोशल मीडियावर त्यांचे 70 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. याच जेरीलन काल दोन लहान मुलांसह बाणेर पाषाण लिंक रोडवरून जात असताना. एका भरधाव वेगात कार चालवणाऱ्या चालकाने तब्बल दोन किलोमीटर लांब पर्यंत त्यांचा पाठलाग केला. अनेकदा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न देखील केला. आणि अखेर काही अंतरावर ओव्हरटेक करून आपली कार थेट जेरीलन यांच्या गाडी समोर उभी केली व त्यानंतर गाडीतून खाली उतरून त्यांना थेट मारहाण केली. ज्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या, नाका मधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव देखील झाला. या घटनेमुळे पुण्यात दिवसाढवळ्या देखील महिला सुरक्षित नाहीत का ? पुण्यात पोलिसांचा धाक राहिलाच नाही का ?, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पोलिसांनी तक्रार दाखल करूनआरोपींवर भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल केंकरे, नावाच्या कारचालकाला व त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यावेळी आरोपी स्वप्नील जेरीलन यांना ओव्हरटेक आणि मारहाण करत होते त्यावेळी त्यांची पत्नी गाडीतच उपस्थित होती. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान या गुन्ह्याचा तपास चतुःर्श्रुंगी पोलिसांकडून केला जात आहे, अशी माहिती डीसीपी विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!