पुणे: पुण्यात आज भारतीय जनता पक्षाचे एक दिवसीय प्रदेश अधिवेशन संपन्न होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाकडे सर्वांचाच लक्ष लागलं असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आजच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहणार असल्याचं समोर आलंय.
याबाबत स्वतः नितीन गडकरी यांनी माहिती दिली असून पुणे येथे आयोजित भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आज उपस्थित राहू शकणार नाही. असं नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. पुढे याबद्दल सर्व कार्यकर्त्यांप्रती दिलगिरी व्यक्त करत आहे. अधिवेशनासाठी आज उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
याच पोस्टमध्ये गडकरी यांनी म्हटले आहे या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन आपण नव्या उर्जेने पक्षाच्या मजबुतीसाठी कार्य कराल, हा विश्वास आहे.
नितीन गडकरी यांची फेसबूक पोस्ट
https://www.facebook.com/share/Qw6NAcaswheFiDTe/?mibextid=oFDknk