‘टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी’ आमदार सुनील टिंगरे यांच्या आंदोलनावर भाजपची प्रतिक्रिया

678 0

आपल्या मतदारसंघावर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी खिल्ली उडवली असून ‘टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी’ असल्याची टीका केली आहे.

पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध मूलभूत प्रश्नांसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे आमदार सुनील टिंगरे सध्या चर्चेत आले आहेत.

पोरवाल रोड वाहतूक कोंडी, एअरफोर्स जागेतील ते धानोरी रोड, नदीकाठचा प्रलंबित रस्ता, विश्रांतवाडी चौकातील बुद्धविहार स्थलांतरित करणे, नगर रोड वाहतूक कोंडी, लोहगावचा पाणी प्रश्न, खंडोबा माळरोड व इतर डीपी रोड, सिद्धार्थनगर झोपडपट्टी पुनवर्सन, धानोरी लक्ष्मी टाऊनशीप ते लक्ष्मी स्मशानभूमी रोड, धानोरी पेलेडीयम रोडच्या रस्त्याची दुरुस्ती अशी विविध विकासकामं करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी उपोषण सुरु केले आहे.

त्यांच्या उपोषणावर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जोरदार टीका केली आहे. टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी असून त्यांचं ते अपयश आहे. सुनील टिंगरे यांना साडेतीन वर्षे एकही मोठे विकासकाम केले नाही. त्यामुळे सुनील टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख आहे अशी टीकाही मुळीक यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!