Congress

Sunil Deodhar : अखंड भारताचे आश्वासन देऊन काँग्रेसने देशाशी विश्वासघात केला : सुनील देवधर

653 0

पुणे : आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने फाळणी दिवसाचे औचित्य साधून विभाजन विभिषिका अंतर्गत मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात झालेल्या ह्या पदयात्रेत भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर ,पुणे शहर प्रभारी माजी खासदार अमर साबळे ,शहराध्यक्ष धीरज घाटे आमदार भीमराव तापकीर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कर्वे रस्त्यावरील स्वातंत्रवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे या पदयात्रेचे समारोप झाला.

यावेळी बोलताना देवधर म्हणाले की 1946 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काँग्रेस ने देशवासीयांची दिशाभूल करून अखंड भारताचे स्वप्न दाखवून सत्तेत येणाचा कुटील प्रयत्न केला त्याच वेळी मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिम लीग चा प्रचार करून पाकिस्तान ची मागणी केली त्यात महात्मा गांधी यांनी झुकते माप देऊन पाकिस्तानची निर्मिती झाली त्यातून फाळणीचा काळाकुट्ट इतिहास लिहिला गेला.

याच आठवणी जगविण्यासाठी विभाजन विभिषिका अर्थात विभाजनाच्या करुण कहाण्या याचे आयोजन करून फाळणी मध्ये ज्यांना दुःखद मृत्यू आला त्यांचे स्मरण आपण केले पाहिजे.

Share This News
error: Content is protected !!