पुणे : बारामुल्ला येथील मास्टर बुरहान हा नऊ वर्षाचा चिमुकला विद्यार्थी हृद्यविकाराच्या यशस्वी शस्त्रकियेनंतर डॅगर परिवार शाळेत परतला आहे. जीवघेण्या आजारातून बुरहान पुन्हा शाळेत परतल्याने संपूर्ण डॅगर परिवारासह भारतीय लष्कराच्या डॅगर विभागाने आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
बुरहानला हृदयविकार हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले होते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकिय उपचार घेणे शक्य नव्हते. त्यामुळे भारतीय लष्कराच्या डॅगर विभाग आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ यांच्या मदतीने दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये बुरहानवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
गत महिन्यात ही शस्त्रकिया पार पडली. तेंव्हापासून त्याचे शिक्षक आणि सहकारी विद्यार्थी त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानुसार बुरहान नुकताच डॅगर परिवारात परतला. यावेळी सर्व परिवाराने त्याचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत केले. बुरहानवरील यशस्वी शस्त्रक्रियेने भारतीय लष्कराच्या मानवतावादी दृष्टीकोनाचे दर्शन घडले. त्यामुळे लष्करासह ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने आनंद व्यक्त केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Amar Kale : वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब
Loksabha Elections : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांनी दिला पाठिंबा
Pune News : कोथुर्णे गावातील ‘त्या’ चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला
Onion Export : 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम; सरकारचा मोठा निर्णय
Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट
Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना
Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ