Rain Update : शहरा सोबतच धरण पाणलोट क्षेत्रात तुरळक पावसाच्या सरी

306 0

Rain Update : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १८ जुलै २०२२ सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला असून तुरळक पावसाच्या सरी पडलेल्या आहेत. तर पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी असला तरी खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे.

खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून १००५ क्यूसेक आणि मुठा नदीत १,७१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आता पर्यंत खडकवासला धरणातून ३.१९ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.

धरणासाठा आणि पाऊस अपडेट १८ जुलै २०२२

खडकवासला – ५ मिमी,

पानशेत- २७ मिमी,

वरसगाव – ३३ मिमी

टेमघर १० मिमी

पावसाची नोंद ,तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १८.५८ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी हा साठा ९.७३ टीएमसी होता.

Share This News
error: Content is protected !!