पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ३५०० विद्यार्थ्यांनी आज सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या ‘स्वराज्य महोत्सवा’अंतर्गत या उपमाचे आयोजन करण्यात आले होते.
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डीईएसच्या नियामक मंडळाच्या सहकार्यवाह प्रा. प्राजक्ता प्रधान, मुख्याध्यापिका ज्योती बोधे, लीना तलाठी, मंजूषा खेडकर यांनी संयोजन केले.