संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.सगळीकडे शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येची बातमी पसरताच प्रत्येकाला हाच प्रश्न पडला की असं नेमकं काय झालं की आपल्या कीर्तनांतून समाज प्रबोधन करणाऱ्या शिरीष महाराज मोरेना इतका मोठा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. प्रत्येकाला पडलेल्या या प्रश्नाच उत्तर समोर आलं. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार सुसाईड नोट्स समोर आल्या.महाराजांनी 32 लाखांचं कर्ज घेतलं होतं.आणि हे कर्ज फेडण्याची आपल्यात ताकद उरली नसल्याने आयुष्य संपवत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण महाराजांनी इतकं कर्ज कशासाठी घेतलं होतं? पाहुयात हा रिपोर्ट.
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी आपले आई वडील बहिण, मित्र परिवार आणि होणाऱ्या पत्नीला उद्देशून चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. यात त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. या चार चिठ्ठ्यांत त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला. पहिल्याच चिठ्ठीत आपल्यावर असलेल्या कर्जाची माहिती दिली. या पहिल्याच चिठ्ठीत शिरीष महाराज मोरेंनी आपल्या मित्रांना साद घातली. प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो. खरंतर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागमे चूकच आहे. पण कृपा करून आई-वडिलांना सांभाळा. चांगलं स्थळ पाहून दीदीचं लग्न लावून द्या. माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे. तेवढा कर्जाचा डोंगर आई-वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती रुपये आहेत हे वडिलांना माहिती आहे, तरीसुद्धा मुंबईतल्या सिंघवींचे-17 लाख रुपये, बचत गटाचे- 4 लाख रुपये, सोने गहाण ठेवलेले त्याचे 1 लाख 30 हजार, वैयक्तिक कर्ज 2 लाख 25 हजार रुपये, गाडी- 7 लाख रुपये आणि किरकोळ देणेदारी- 80 हजार रुपये आहे. महाराजांवर असं एकूण 32 लाख 35 हजारांच कर्ज होत. त्यांनी पुढे चिठ्ठीत लिहून ठेवलं यातील गाडी विकून ती निल होईल. त्यानंतर 25 लाखांचे कर्ज उरते. तुम्ही सर्वांनी थोडी-थोडी मदत करून आई-वडिलांना जपा. तुम्हाला वाटत असेल मी हे सहज फेडू शकलो असतो. पण आता लढण्याची ताकद नाही. मला माफ करा.आर्थिक विवंचनेतून महाराजांनी आपलं आयुष्य संपवलं. शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं. असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही असं नमूद केल आहे.