Breaking News

सायलेन्सर चोरटे! हडपसर येथे एका टोळीकडून 16 सायलेन्सर जप्त; सहा जणांना अटक VIDEO

427 0

पुणे : पुणे शहर परिसरात चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकानं अटक केली. हडपसर येथे ही कारवाई करण्यात आली.

या टोळीतील आरोपींकडून 16 सायलेन्सर जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरिफ सलीम शेख, हुसेन बढेसाहब शेख, साहील वसीम शेख, सहजाद अक्रम खान, रहिम खलील शेख, सोहेल सलीम खान अशी अटक आरोपींची नावं आहेत.

हे सर्व आरोपी हडपसर येथील राहणारे आहेत. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं हडपसर भागातील म्हाडा सोसायटी परिसरात ही कारवाई केली. शहरात मागील काही दिवसात सायलेन्सर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यातच हडपसर भागात सायलेन्सर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.

या टोळीकडून 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे 16 सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. सायलेन्सर चोरल्यानंतर हे आरोपी त्या सायलेन्सरमधील कन्व्हर्टरमध्ये असलेली मौल्यवान प्लॅटिनम धातूमिश्रित माती काढून ती परराज्यातील आरोपींना विकत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.

 

Share This News
error: Content is protected !!