पुण्यातील धक्कादायक प्रकार ! धर्मांतरासाठी महिलेला खोलीत डांबून ठेवलं, अत्याचार केला…

711 0

राज्यात अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. राज्यापाठोपाठ पुण्यात देखील अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पुण्यात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेवर जबरदस्ती करण्यात आली. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील करण्यात आला आहे. इतकंच नाही तर पीडित महिलेला एका घरात डांबून ठेवत तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला आहे. हा संपूर्ण प्रकार विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माधवनगर धानोरी इथे घडला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली असून त्यानुसार, याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करून धानोरीत बोलावले. नंतर यातील आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी तक्रारदार यांना डांबून ठेवले. इतकेच नाही तर दोघांनीही पीडितेच्या डोक्याला बंदूक लावत ठार मारण्याची धमकी दिली. आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर आरोपी सागर लांडगेने लोहगाव परिसरात घेऊन जात एका खोलीत डांबले. दरम्यानच्या काळात पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर तिन्ही आरोपींनी पीडित महिलेच्या घरातील देवांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!