धक्कादायक : पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; असे काय घडले ? वाचा सविस्तर

3782 0

पुणे : पुण्यातील केशवनगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आणि संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. केशवनगर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्या केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक विवंचनेमुळे या चौघा जणांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुंडवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. थोटे कुटुंब केशवनगर मध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वीच हे चौघेजण अमरावतीहून पुण्यामध्ये स्थायिक झाले होते.

यामध्ये दीपक पोटे वय वर्ष 59, इंदू थोटे वय वर्ष 45, ऋषिकेश थोटे वय वर्ष 24 आणि समीक्षा थोटे वय वर्ष 17 असं आत्महत्या केलेल्या या चौघांची नावे आहेत. या परिपूर्ण कुटुंबाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आर्थिक नुकसानीमुळे या चौघांनी ही आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. चौघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!