#PUNE : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार उतरणार मैदानात

571 0

पुणे : कसबा पोटनिवडणुकेचा प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. प्रमुख पक्षांसह सर्वच उमेदवार आणि समर्थक मैदानात उतरून प्रचाराचा धडाका लावता आहेत. गुरुवारी भाजपचे किंग मेकर समजले जाणारे खासदार गिरीश बापट तब्येत नासाज असताना भाजप उमेदवार रासने यांच्या प्रचारासाठी उपस्थित होते. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचे सारथ्य करणार आहेत.

कसबा चिंचवड विधानसभेच्या प्रचारात शरद पवार स्वतः २२ तारखेला शरद पवार प्रचार करणार आहेत. दरम्यान आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले आहेत. दोन्हीही प्रमुख पक्षांनी कंबर कसल्यामुळे हि लढत नक्कीच चुरशीची होणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!