पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे असून शहरात आजपासून 144 कलम (Section 144) लागू करण्यात आला आहे. पुणे शहरात कायदे, नियम तसंच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी 31 मार्चपर्यंत शहरात 144 कलम लागू असणार आहे. शहरातील बार, रेस्टॉरंट, पब आणि रूफटॉप रेस्टॉरंटसाठी या आस्थापनांसाठी हे आदेश जारी करण्यात आला आहे.
या आस्थापनांना त्यांचे कामकाज पहाटे 1.30 वाजेपर्यंतच करता येणार आहे. आदेशानुसार 31 मार्च 2024 पर्यंत कलम 144 लागू राहणार आहेत. या काळात शहरातील इमारतींच्या टेरेसवरील अनधिकृत पब्स, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय वेळेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश
Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन