पालकांसाठी महत्वाची माहिती : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

268 0

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक,माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना 14 जुलैला (उद्या) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.                                                                                                                                                        सध्या मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा बसतो आहे. मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक कारणामुळे वाहन चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यातच लहान-मोठे अपघात देखील घडत आहेत. त्यातच हवामान विभागाने देखील पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता,शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना आणि पुन्हा घरी जाताना धोका पत्करावा लागत आहे.

म्हणूनच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक,माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना 14 जुलैला (उद्या) सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे,महानगरपालिका आयुक्त यांनी घोषित केले आहे. या विषयाचे परिपत्रक सर्व शाळांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे 14 जुलै रोजी शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी आहे याची नोंद पालकांनी घ्यावी.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!