इयत्ता पहिली ते 8 वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मोठा निर्णय

182 0

पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीला 45 टक्के रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईत निर्णय घेणार नाही. अजून एकदोन आठवडे थांबूनच मगच कोरोना निर्बंधाच्या शिथिलते बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माहिती पवार यांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णसंख्या बघून शाळांबाबतच निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून शहरातील पहिली ते 8 वीपर्यंतच्या शाळा हाफ डे पद्धातीने सुरु केल्या होत्या. मात्र आता हाफ डे बंद करून पूर्णवेळ शाळा सुरू करणार, हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शाळांचा हा निर्णय फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड पूरता मर्यादित असल्याचेही त्यांनी संगितले आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी यांनी येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये स्लब कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबतचाही आढावा घेत माहिती दिली यामध्ये दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. दुसरीकडं जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत असताना मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. यामागची कारण शोधण्याचं काम डॉक्टर करत आहेत. मागच्या लाटेच्या तुलनेत मृत्यू संख्या वाढले असल्याचेमत त्यांनी नोंदवली. शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागील आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी जेवढी लस पाहिजे तेवढी नाही. आजही लसीकरण झालंनाही. उद्याही होणार नाही. सोमवारी लस मिळेल. मुंबईला गेल्यावर केंद्राशी संपर्क साधून लस मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोविड सेंटर बंद आहे. त्याला भाडं द्यावं लागत आहे. मात्र, 28 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहून मार्चमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं ठरलं आहे.

Share This News
error: Content is protected !!