Sanjay Kakde

Sanjay Kakade : अखेर संजय काकडे यांना ‘या’ प्रकरणात न्यायालयामध्ये व्हावे लागले हजर

1600 0

पुणे : बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले या सख्या मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना न्यायालयासमोर हजर व्हावे लागले. युवराज ढमाले यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन संजय काकडे व उषा काकडे यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल केली होती.

यानंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपी संजय काकडे व उषा काकडे यांना 4 नोव्हेंबर 2020 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर FIR व पोलिस तपासाप्रमाणे तीन साक्षीदारांनी न्यायालयात येऊन कलम 164 प्रमाणे आरोपीच्या विरुद्ध साक्ष दिली. मात्र तरीदेखील संजय काकडे हे एकदाही न्यायालयात हजर न राहता गैरहजेरी माफी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करीत होते.

यानंतर फिर्यादी ढमाले यांनी संजय काकडे यांना पकड वॉरंट काढण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश निमसे यांच्याकडून देण्यात आले होते. या आदेशानुसार अखेर संजय काकडे यांना आज न्यायालयासमोर हजर व्हावे लागले.

Share This News
error: Content is protected !!