Rohit Pawar Office

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

914 0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीं विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने प्रवेश करत ते जाळण्याचा प्रयत्न केला.

Congress : विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून ‘या’ 4 नेत्यांच्या नावाची चर्चा

हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
यामध्ये आमदार रोहित पवारांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाचा काही भाग जळाला आहे. सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आली. या कार्यलयाच्या शेजारी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून जाळपोळ केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. हडपसर पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Pune Festival : 35 व्या पुणे फेस्टिव्हलची पूर्वतयारी बैठक संपन्न

रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया नाही
रोहित पवार (Rohit Pawar) राष्ट्रवादी कर्जत- जामखेडचे आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे पहिल्यांदाच कर्जत या आपल्या मतदारसंघात आले आहेत. घडलेल्या प्रकारानंतर रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!